Baramati Municipal Elections : 20-20 लाखांत 4 उमेदवार फोडले, पुतण्याचा दादांवर गंभीर आरोप; योगेंद्र पवारांच्या दाव्यानं खळबळ

Baramati Municipal Elections : 20-20 लाखांत 4 उमेदवार फोडले, पुतण्याचा दादांवर गंभीर आरोप; योगेंद्र पवारांच्या दाव्यानं खळबळ

| Updated on: Nov 24, 2025 | 11:07 PM

बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत योगेंद्र पवारांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. 20-20 लाख रुपये देऊन आपले चार उमेदवार फोडले आणि त्यांना माघार घ्यायला लावली, असा दावा योगेंद्र पवारांनी केला. या आरोपांमुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये मुख्य लढत दिसून येत आहे.

बारामती नगरपालिकामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेंद्र पवारांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी त्यांचे चार उमेदवार 20-20 लाख रुपये देऊन फोडले आणि त्यांना माघार घ्यायला लावली, असे योगेंद्र पवार म्हणाले.

बारामती नगरपालिकेच्या एकूण 41 जागा आहेत, त्यापैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 33 जागांवर मतदान होणार आहे. याच आठ बिनविरोध जागांपैकी चार जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांना 20-20 लाख रुपये देऊन माघार घ्यायला लावल्याचा आरोप योगेंद्र पवारांनी केला आहे. दुसरीकडे, अजित पवारांच्या गोटातून या आरोपांना “अफवा” संबोधून, बारामतीकरांचा योगेंद्र पवारांवर विश्वास नसल्याचे म्हटले जात आहे. ही निवडणूक विकासाची असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.

Published on: Nov 24, 2025 11:07 PM