Walmik Karad : आण्णा… हे सगळे प्रकार माझ्यासोबत… कराड अन् बाळा बांगर यांच्या पत्नीचा ऑडिओ व्हायरल

Walmik Karad : आण्णा… हे सगळे प्रकार माझ्यासोबत… कराड अन् बाळा बांगर यांच्या पत्नीचा ऑडिओ व्हायरल

| Updated on: Jul 25, 2025 | 5:28 PM

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड सध्या अटकेत आहे. तर महादेव मुंडेंच्या हत्येप्रकरणात विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी वाल्मिक कराड गंभीर आरोप केले आहेत.

वाल्मिक कराड बद्दल धक्कादायक खुलासे करणाऱ्या विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांच्या पत्नीची आणि वाल्मिक कराडची एक कथित कॉल रेकॉर्डिंग समोर आली असून ही ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये वाल्मिक कराड आणि विजयसिंह बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर यांचा संवाद असल्याचे ऐकायला मिळत आहे. घरगुती वादाची ही कथित कॉल रेकॉर्डिंग सध्या बीड जिल्ह्यात चांगलीच व्हायरल होत आहे. बांगर यांच्या पत्नी मयुरी बांगर यांच्याकडून अनेक आरोप करण्यात आले असून मारहाण करून चारित्र्यावर संशय घेतला असाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आलाय.

दरम्यान, माझ्या घरगुती वादाच्या कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी म्हटलंय. तर महादेव मुंडे हत्या प्रकरणात आपण भूमिका घेतल्याने हा बदनामीचा डाव असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र व्हायरल झालेल्या कथित कॉल रेकॉर्डिंगमुळे बीड जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपची टीव्ही ९ मराठी पुष्टी करत नाही.

Published on: Jul 25, 2025 05:28 PM