Raigad Politics : भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांना जोर का धक्का.. राजकीय समीकरणं बदलणार? नगराध्यक्षांसह 9 नगरसेवक शिंदेंच्या सेनेत अन्…

Raigad Politics : भरत गोगावले यांचा सुनील तटकरे यांना जोर का धक्का.. राजकीय समीकरणं बदलणार? नगराध्यक्षांसह 9 नगरसेवक शिंदेंच्या सेनेत अन्…

| Updated on: Nov 19, 2025 | 1:16 PM

महाराष्ट्र राजकारणात स्थानिक निवडणुकांचा धुरळा पाहायला मिळत असताना रायगड जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. बघा काय आहे अपडेट?

राज्याच्या राजकारणात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रचाराचे मैदान गाजवायला सुरुवात केली आहे. पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांसाठी ते उद्यापासून (२२ नोव्हेंबरपासून) ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यभरात प्रचार सभा घेणार आहेत. या कालावधीत ते दररोज सरासरी तीन प्रचारसभा घेण्याचे नियोजन आहे. रायगड जिल्ह्यातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांना रायगडमध्ये पुन्हा एकदा धक्का दिला आहे. श्रीवर्धनमधील राजकीय समीकरणे यामुळे बदलण्याची शक्यता आहे. म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवकांनी सेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्याने तटकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.

Published on: Nov 19, 2025 01:16 PM