Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत

Bharat Gogawale : अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर, भरत गोगावलेंचं विधान चर्चेत

| Updated on: Nov 21, 2026 | 8:16 AM

मंत्री भरत गोगावलेंनी पंढरपूरमधील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अभिजीत पाटलांना शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यास मंत्रिपद देण्याची थेट ऑफर दिली आहे. गोगावलेंच्या या ऑफरवर अभिजीत पाटलांनी कोणतीही राजकीय भूमिका न घेता, मतदारसंघातील कार्यक्रमाचे प्रोटोकॉल आणि प्रश्न मांडण्यावर भर दिला.

भरत गोगावलेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर दिली आहे. पंढरपूरमधील एका कार्यक्रमादरम्यान बोलताना गोगावले म्हणाले की, “जर अभिजीत पाटील शिवसेना पक्षामध्ये आले, तर त्यांना मंत्रीपद देऊ शकतो.” या ऑफरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावर आमदार अभिजीत पाटलांनी तात्काळ कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देणे टाळले. त्यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना सांगितले की, ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांसारख्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मतदारसंघात (शेगाव दुमाला) आयोजित कार्यक्रमात प्रोटोकॉलनुसार थांबले होते.

मतदारसंघातील ६५ एकर जमिनीच्या प्रश्नावर आणि अन्य अडीअडचणींवर चर्चा करण्यासाठी त्यांची उपस्थिती आवश्यक होती. मुंबईत गेल्यानंतर अनेक प्रश्न विधिमंडळात मांडले जातात. परंतु, वरिष्ठ नेते मतदारसंघात आल्यावर थेट प्रश्न मांडले नाहीत, तर त्या प्रश्नांचे गांभीर्य कमी होते, असे पाटील यांनी नमूद केले. या ऑफरमुळे भविष्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Published on: Nov 21, 2026 8:16 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us