कितीबी समोर येवद्या, त्यांला एकटा बास! भास्कर जाधवांच्या स्टेट्सची चर्चा

कितीबी समोर येवद्या, त्यांला एकटा बास! भास्कर जाधवांच्या स्टेट्सची चर्चा

| Updated on: Aug 10, 2025 | 4:43 PM

भास्कर जाधव यांचे एक व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे.

भास्कर जाधव यांचे एक व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे. स्थानिक ब्राह्मण समाजाशी झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, जाधव यांनी आपल्या विरोधकांना अप्रत्यक्षपणे इशारा देण्यासाठी हे स्टेटस ठेवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांनी स्टेटसमध्ये व्यक्त केलेल्या भावनांमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत, आणि हा प्रकार आता चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.

जाधव यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ब्राह्मण समाजाच्या पत्राला एका व्हिडीओद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. या व्हिडीओ स्टेटसमध्ये, भिडा किती, तुम्ही नडा किती, द्या द्यायचा तेवढा त्रास, कितीबी समोर येवद्या, त्यांला एकटा बास असा आशय आहे. या स्टेटमुळे राजकीय वातावरण तापले असून, विशेषतः खोतकी प्रकरणावरून गुहागरमधील ब्राह्मण समाज आणि भास्कर जाधव यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर हे स्टेटस विशेष महत्त्वाचे मानले जात आहे.

Published on: Aug 10, 2025 04:01 PM