भिवंडीतील नायगाव परिसरात कापड दुकानाला भीषण आग; अग्निशमनदलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल
भिवंडी : भिवंडीत पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळतंय. भिवंडी शहरातील नायगाव परिसरातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. ‘आलिया कॉम्प्लेक्स’ या तीन मजली इमारतीच्या तळमजल्या कपड्याच्या दुकानाला आग लागली आहे. पहाटेच्या सुमारास आग लागल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. या आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनांस्थळी दाखल […]
भिवंडी : भिवंडीत पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळतंय. भिवंडी शहरातील नायगाव परिसरातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. ‘आलिया कॉम्प्लेक्स’ या तीन मजली इमारतीच्या तळमजल्या कपड्याच्या दुकानाला आग लागली आहे. पहाटेच्या सुमारास आग लागल्याने रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. या आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनांस्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीत गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले आहेत. तसंच अग्निसमन दल आणि स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे.
Published on: Apr 15, 2023 8:27 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
