Ashok Kharat Case Big Update | आता 14 दिवस सुटका नाहीच… भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; चौकशी सुरू

Ashok Kharat Case Big Update | आता 14 दिवस सुटका नाहीच… भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; चौकशी सुरू

| Updated on: Apr 01, 2026 | 12:30 PM

राज्यात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत संपल्यावर त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

राज्यात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातची मुदत संपल्यावर त्याला कडक पोलीस बंदोबस्तात नाशिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. एसआयटीच्या पथकाने भोंदू खरातला घेऊन नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. याआधी पोलीस कोठडीमध्ये ठेवलेल्या खरातला एसआयटीकडून कोठडीची मागणी देखील करण्यात आली होती. सरकारी वकील शैलेंद्र बागले यांनी युक्तिवाद सादर केला, सुनावणी झाली आणि अखेर न्यायालयाने 14 दिवसांची कोठडी मंजूर केली. या कालावधीत एसआयटी भोंदू खरातची चौकशी पुन्हा करणार आहे. एकूणच बघितलं तर, अशोक खरात त्याच्यावरचे गुन्हे जे आहेत ते वाढतच चालले आहेत.

Published on: Apr 01, 2026 12:29 PM
Follow Us