Maharashtra Police Bharti 2025 : राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलीस दलात ‘इतक्या’ जागांवर जम्बो भरती
एक महत्त्वाची बातमी आहे! महाराष्ट्र राज्यात लवकरच 14,000 पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. मंत्रिमंडळाने या भरतीला मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलात लवकरच पदं भरली जाणार आहेत. मंत्रिमंडळाने या भरतीला मंजुरी दिली असून राज्यातील पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. राज्यात तब्बल १४ हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या या पोलीस भरतीसंदर्भात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. पोलीस भरती बाबतचा हा मोठा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत नुकताच घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरती संदर्भातील निर्णयाला मान्यता मिळाली असल्याने आता लवकरच महाराष्ट्रातील पोलीस भरती प्रक्रियेची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे १४ हजार पोलीस भरतीच्या मंजुरीसह अजून काही निर्णय झाले. यामध्ये राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्यात आली तर सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण करता येणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल करण्यात आल्या असून शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली. यासह सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय
