BMC Elections 2025 :  BJP मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकणार, अशी आहे BMC निवडणुकीची रणनीती!

BMC Elections 2025 : BJP मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकणार, अशी आहे BMC निवडणुकीची रणनीती!

| Updated on: Sep 10, 2025 | 10:40 AM

भाजप मुंबई महापालिकेचं रणनीती फूंकणार आहे. तर 16 सप्टेंबर रोजी मुंबई भाजपकडून विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे वरळी डोंबमध्ये हा मेळावा पार पडणार असल्याची माहिती आहे. मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

मुंबई महापालिका निवडणुका 2025च्या पार्श्वभूमीवर भाजपने महत्त्वाची रणनीती आखली आहे. भारतीय जनता पक्षाने 16 सप्टेंबर रोजी वरळी डोम येथे “विजय संकल्प” असा मोठा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील अशी माहिती आहे. अमित शहा यांच्या मुंबई अध्यक्षपदाच्या सूत्रे हाती घेतल्यानंतर हा भाजपचा पहिलाच मोठा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा सहभाग अपेक्षित आहे. हा मेळावा भाजपच्या येणाऱ्या निवडणुकीच्या रणनीतीचा एक भाग असण्याची शक्यता आहे.

 

Published on: Sep 10, 2025 10:40 AM