नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करणार

नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजप आक्रमक; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात तक्रार दाखल करणार

| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 12:50 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे.यवतमाळ येथील भाजप नेत्यांकडून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे.यवतमाळ येथील भाजप नेत्यांकडून आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार करण्यात येणार आहे. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्या विरोधात यवतमाळ जिल्ह्यातील 5 पोलीस ठाण्यात भाजप कडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रारी केल्या जाणार अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिली आहे. नारायण राणेंच्या विरोधात तक्रार नंतर आता भाजप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधात तक्रार देऊन शिवसेनेला घेरण्याच्या तयारीत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड यवतमाळ सह 5 पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली जाणार आहे.