छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचही नाव असून ते नाराज असल्याचे दिसतंय.
महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी कार्यक्रमात महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. तर काही वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचही नाव असून ते नाराज असल्याचे दिसतंय. यावर भाजप नेते आशिष देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांचा राज्यपालपदासाठी विचार केला जाऊ शकतो, असं वक्तव्य भाजप नेते आशिष देशमुख यांनी केले आहे. तर छगन भुजबळ यांचं मोठं योगदान आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छगन भुजबळ यांचं योग्य पुनर्वसन करेल, असंही आशिष देशमुख म्हणाले. छगन भुजबळ यांच्या नाराजीवर बोलत असताना आशिष देशमुखांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावरही भाष्य केले आहे. ‘सुधीर मुनगंटीवार यांनाही मोठं स्थान मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत’, अशी माहितीही आशिष देशमुख यांनी दिली आहे.
