हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, भाजपला राम-राम करून ‘तुतारी’ हाती घेणार

| Updated on: Oct 04, 2024 | 11:11 AM

शरद पवार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. कारण हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला कायमचा राम-राम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. तर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय जाहीर करणार आहे.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचं अखेर ठरलंय. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी हाती घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी मुंबईतील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. शुक्रवारी इंदापूर येथे पत्रकार परिषद घेऊन ते याची जाहीर घोषणा करतील असे सांगितले जात आहे. एकीकडे हर्षवर्धन पाटील शरद पवार यांना भेटले तर दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांचे पुत्र राजवर्धन पाटील आणि अंकिता पाटील यांनी व्हॉट्सअपवर तुतारी या चिन्हाचं स्टेटस ठेवलं. वडिलांच्या घोषणेनंतर अंकिता पाटील सुद्धा भाजपच्या युवा मोर्चाचा राजीनामा देणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांची काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यासोबत भेट झाली. त्याचवेळी हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार हे निश्चित झालं होतं. त्यानंतर आता हर्षवर्धन पाटलांचा निर्णय फायनल झाला आहे.

Published on: Oct 04, 2024 11:08 AM