Pritam Munde यांच्याकडून Rajesh Tope यांचं कोरोना काळातील चांगल्या कामावरुन कौतुक
आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले असे कौतुक भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलंय.
बीड : कोव्हीड काळात राज्य सरकारने चांगले काम केले आहे. विशेषतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मी कौतुक करते. राजकीय मंचावर येऊन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे विषय वेगळे असतात. आरोग्य हा असा विषय आहे की त्यामध्ये कोरोनाचा सामना करत असताना राज्य सरकारने सतर्क राहून कार्य केले असे कौतुक भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी केलंय.
