Mayor | भाजपचंच वर्चस्व… आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून

Mayor | भाजपचंच वर्चस्व… आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून

| Updated on: Feb 06, 2026 | 2:00 PM

राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मोठा यश मिळाल्याचे दिसून आले. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिक या 8 प्रमुख महानगरपालिकांमध्ये महापौर निवडीच्या प्रक्रियेला आज पूर्णविराम मिळाला.

राज्यातील विविध महानगरपालिकांमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मोठा यश मिळाल्याचे दिसून आले. जळगाव, धुळे, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, सोलापूर आणि नाशिक या 8 प्रमुख महानगरपालिकांमध्ये महापौर निवडीच्या प्रक्रियेला आज पूर्णविराम मिळाला. सोलापूर, जळगाव आणि अहिल्यानगरमध्ये महापौर पदासाठी निवडणूक बिनविरोध झाली, तर नागपूर आणि धुळ्यात भाजपने मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. या निकालामुळे महापालिकांमध्ये सत्ताधारी पक्षांचे वर्चस्व अधिक मजबूत झाले आहे.

नाशिकमध्ये भाजपच्या हिमगौरी अडके यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी विलास शिंदे यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे रवी लांडगे महापौरच्या खुर्चीवर विराजमान झाले आहे, तर शर्मिला बाबर ह्या उपमहापौर पदी विराजमान झाल्या आहेत. अहिल्यानगरमध्ये महापौरपदी राष्ट्रवादीच्या ज्योती गाडे यांची वर्णी लागली आहे तर उपमहापौरपदी भाजपचे धनंजय जाधव यांची निवड झाली आहे. जळगाव महापालिकेत भाजपच्या दीपमाला काळे यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे मनोज चौधरी यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. जळगाव महापालिकेच्या 17 व्या महापौर म्हणून दीपमाला काळे यांनी पदभार स्वीकारला.

Published on: Feb 06, 2026 02:00 PM