Sharanu Hande : पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या अपहरणावेळी रोहित पवारांचा VIDEO कॉल, म्हणाले…त्याला जाम मस्ती, गंभीर आरोप काय?

Sharanu Hande : पडळकरांच्या कार्यकर्त्याच्या अपहरणावेळी रोहित पवारांचा VIDEO कॉल, म्हणाले…त्याला जाम मस्ती, गंभीर आरोप काय?

| Updated on: Aug 08, 2025 | 5:28 PM

पोलीस कोठडीच्या मागणीला आरोपीचे वकील ऍड. शरद पाटील यांनी युक्तिवाद करत विरोध केला. तर आरोपीकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने पोलीस कोठडी ऐवजी न्यायालयीन कोठडी द्यायची विनंती केली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायमूर्ती वी. ए. कुलकर्णी यांनी पोलीस कोठडी सुनावली

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा समर्थक शरणू हांडे अपहरण प्रकरणातील आरोपी अमित सुरवसे याच्यासह 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीकडून कोयता, हॉकी स्टिक, साडी, ब्लेड पान आदी एकूण 25 शास्त्रास्त्र आणि वस्तू पोलिसांनी हस्तगत केले आहे. या प्रकरणाचा अधिकचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपीच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली आहे. दरम्यान, अपहरणाच्या प्रकारानंतर शरणू हांडेंवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच शरणू हांडेंनी टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. ‘अपहरण करताना आरोपींनी म्हटलं की आमच्या पवारांच्या नादाला लागला, राष्ट्रवादीच्या नादाला लागला. आमच्या राष्ट्रवादीचे पोरं कसे असतात दाखवतो’, असं शरणू हांडेंनी सांगितलं. यावेळी त्यानं अपहरण करतानाचा संपूर्ण प्रसंग सांगितला.

Published on: Aug 08, 2025 05:28 PM