36 जिल्हे 72 बातम्या | 6.30 PM | 6 October 2021

| Updated on: Oct 06, 2021 | 7:24 PM

राज्यात 6 जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या आहेत.

Follow us on

राज्यात 6 जिल्हा परिषदांच्या 85 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला समसमान जागा मिळाल्या आहेत. मात्र, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही शिवसेनेला फारशी चमक दाखविण्यात आलेली नाही.

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते. अपवादात्मक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. तर मनसे आणि भाजपचीही युती झाली होती. मात्र, एकंदरीत सर्वच ठिकाणी प्रत्येक पक्षाने आपआपलं बळ दाखवलं होतं. जिल्हा परिषदेच्या 85 जागांचे निकाल हाती आले आहेत. त्यापैकी 23 जागांवर भाजपने दणदणीत विजय मिळवून आपणच राज्यात नंबर वन असल्याचं दाखवून दिलं आहे. तर काँग्रेसने 17, राष्ट्रवादीने 17, शिवसेनेने 12 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविल आहे. तर आघाडी आणि युतीनिहाय आकडेवारी पाहता महाविकास आघाडीने 46, भाजपने 23 आणि इतरांनी 16 जागांवर विजय मिळविला आहे.