
Hingoli | हिंगोलीच्या सेनगावात खड्ड्यात गाडी पडून 4 जणांचा मृत्यू
हा खड्डा महामार्गावरच असूनही त्याठिकाणी कोणताही धोक्याचा फलक लावण्यात आला नव्हता. त्यामुळे कार थेट या खड्ड्यात जाऊन कोसळली.
हिंगोलीच्या राज्य महामार्गावर घडलेल्या एका विचित्र अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. येथील सेनगावनजीक हा प्रकार घडला. या मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. मात्र, या पूलाचे काम बऱ्याच काळापासून रखडले आहे. या पुलासाठी एक खड्डा खोदण्यात आला होता.
हा खड्डा महामार्गावरच असूनही त्याठिकाणी कोणताही धोक्याचा फलक लावण्यात आला नव्हता. त्यामुळे कार थेट या खड्ड्यात जाऊन कोसळली. हा खड्डा पाण्याने भरलेला होता. त्यामुळे पाणी थेट गाडीतील लोकांच्या नाकातोंडात गेले. परिणामी सर्वांचा मृत्यू झाला. चौघेही मृत लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा येथील रहिवासी आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
माझे भाऊ जरांगे घरी आले तर मी स्वागत करेल, अमृता फडणवीस यांचे विधान..
जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांचं महत्वाचं विधान
जरांगेंची आंदोलनाबाबत मोठी घोषणा, कार्यक्रमात बदल, मुंबईला एकटे जाणार
'रामायणा'चे पहिले मोशन पोस्टर प्रदर्शित, 'सिया राम'ची पहिली झलक चर्चेत
मंत्री पंकजा मुंडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन, छगन भुजबळांनी घेतले अंजी
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,