tv9 Marathi Special Report | माजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रकरणात कर्नाटकात गुन्हा दाखल; मोठ्या गुन्हेगारी कटाचा संशय
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित प्रकरणात अखेर कर्नाटक राज्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे उपमुख्यमंत्रीपद भूषवूनही त्यांच्या अपघाताबाबत येथे गुन्हा दाखल न झाल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित प्रकरणात अखेर कर्नाटक राज्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक वर्षे उपमुख्यमंत्रीपद भूषवूनही त्यांच्या अपघाताबाबत येथे गुन्हा दाखल न झाल्याने या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या अपघातामागे मोठा गुन्हेगारी कट असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई आणि बारामती येथे गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्थानिक पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. दरम्यान, कर्नाटकात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, देशाच्या राजकीय इतिहासात अशा प्रकारची घटना दुर्मिळ मानली जात आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये सत्तेमध्ये असलेल्या दादा गटात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री आहे राष्ट्रवादीच्या त्या प्रमुखही आहेत. सुनेत्रा पवार आणि अजित दादांच्या गटातल्या नेत्यांन यावर विशेष प्रतिक्रिया दिल्याचं उदाहरण नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, येत्या काळात आणखी महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
