मध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक, अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडण्याच्या प्रशासनाच्या सूचना

मध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक, अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडण्याच्या प्रशासनाच्या सूचना

| Edited By: | Updated on: Jan 02, 2022 | 12:02 PM

मध्य रेल्वेनं आज प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक (Central Railway Mega block) घेण्यात येतो आहे.

मध्य रेल्वेनं आज प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेवर 24 तासांचा मेगाब्लॉक (Central Railway Mega block) घेण्यात येतो आहे. पहाटे पाच वाजल्यापासून उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत हा महामेगाब्लॉक घेण्यात येतो आहे. मध्य रेल्वेच्या बहुप्रतिक्षित अशा पाचव्या आणि सहाव्या लाईनसाठी हा मेगाब्लॉक घेतला जात असून यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कळवा (Kalawa) आणि दिवा (Diwa) दरम्यान, अप आणि डाऊन स्लो लाईनवर (Slow Line) हा ब्लॉक घेतला जातो आहे.