Central Railway : ओ भाऊ… आमचा माणूस येणार… सीट आमची; कसारा-कल्याण लोकलमध्ये दादागिरी, बघा व्हायरल VIDEO

Central Railway : ओ भाऊ… आमचा माणूस येणार… सीट आमची; कसारा-कल्याण लोकलमध्ये दादागिरी, बघा व्हायरल VIDEO

| Updated on: Aug 04, 2025 | 10:38 AM

दररोज एकाच ट्रेनमध्ये एका डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अशा गटबाजीमुळे प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्याची वेळ येत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये वादाचे प्रमाण देखील वाढले आहे.

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. रोज सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना कार्यालयीन वेळांमध्ये ट्रेनमध्ये चढणं मुश्किल होत असल्याचे वास्तव दाखणारे व्हिडीओही समोर आलेत. अशातच कसारा ते कल्याण लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांचा गोंधळ पाहायला मिळाला. कसारा लोकलमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या ग्रृपसाठी सीट राखीव ठेवल्याचा प्रकार पाहायला मिळाला. इतकंच नाहीतर ग्रृपमधल्या प्रवाशांची इतरांवर दादागिरी देखील पाहायला मिळाली.

पहाटे 6:10 वाजताच्या कसाऱ्याहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये हा दादागिरीचा प्रकार समोर आलाय.  एका सीटवर स्वतः बसून उरलेल्या दोन सीट्सवर बॅगा ठेवत आमचा माणूस येणार आहे, दोन्हीही सीट आमच्या आहेत. कोणी बसू नये. आम्ही रोज असंच करतो तुम्हाला जे करायचा आहे करा, असे सांगत इतर प्रवाशांना बसण्यास मज्जाव करत असल्याचे समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. संतप्त झालेल्या इतर प्रवाशांनी व्हिडिओ काढत ही जागा आम्हाला हवी, असे सांगत ट्रेनमध्ये गोंधळ घातला.

Published on: Aug 04, 2025 10:38 AM