Chandrakant Patil : गौतमीला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटलांचा ‘तो’ फोन कॉल व्हायरल, दादांना त्यांच्याच सरकारच्या पोलिसांवर भरवसा नाही?

Chandrakant Patil : गौतमीला उचलायचं की नाही? चंद्रकांत पाटलांचा ‘तो’ फोन कॉल व्हायरल, दादांना त्यांच्याच सरकारच्या पोलिसांवर भरवसा नाही?

| Updated on: Oct 05, 2025 | 10:43 AM

चंद्रकांत पाटील यांच्या "गौतमीला उचलायचं की नाही?" या प्रश्नामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गौतमी पाटीलच्या ड्रायव्हरने केलेल्या अपघातानंतर मंत्री पाटील यांनी पोलिसांना फोन करून तिच्यावर कारवाईची विचारणा केली.

गौतमी पाटीलच्या गाडीच्या अपघातावरून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना केलेल्या फोन कॉलमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये चंद्रकांत पाटील एका डीसीपीला “गौतमीला उचलायचं की नाही?” अशी विचारणा करताना दिसत आहेत.

गौतमी पाटीलचा ड्रायव्हर रिक्षाला धडकल्याच्या घटनेनंतर हा वाद सुरू झाला. पोलिसांच्या एफआयआरनुसार, अपघाताच्या वेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती. तरीही, चंद्रकांत पाटील यांनी तिला ताब्यात घेण्याबाबत किंवा भरपाई देण्याबाबत आग्रही भूमिका घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी टीका करत, मंत्र्यांनी अशाप्रकारे दबाव आणणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. रोहित पवार यांनी पाटील यांच्या मतदारसंघातील इतर घटनांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Published on: Oct 05, 2025 10:43 AM