Chandrakant Patil | बाळासाहेबांनी थोबाडीत लावली असती – चंद्रकांत पाटील
संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकुन किव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत दिली असती, असा घणाघात शनिवारी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते.

नाशिकमध्ये भाजपची बडी मंडळी विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यासाठी आली आहेत. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्रिपुरा येथील कथित घटनेवर महाराष्ट्रात उमटलेल्या पडसादावरून शिवसेनेला घेरले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी रझा अकादमी हे भाजपचे पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण इथवर पोहोचलं आहे. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद इथे पडण्याचे काय कारण, असा सवाल केला होता. पाटील यांनी या वक्तव्याचा समाचार घेतला. ते म्हणाले, संजय राऊत यांचे वक्तव्य ऐकुण किव येते. राजकारणासाठी किती लाचार व्हाल. आज स्वर्गीय बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी एक थोबाडीत मारली असती, अशी घणाघाती टीका केली.