Chandrakant Patil | …हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यादांच : चंद्रकांत पाटील

| Updated on: Aug 24, 2021 | 5:21 PM

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना अटक केले आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Follow us on

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यानंतर अखेर अटक करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली. नारायण राणेंच्या अटकेवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘एका वाक्यावर केंद्रीय मंत्र्याला अटक होत असेल तर राज्यपाल आणि पंतप्रधानांवर शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या विधानांवर त्यांना हजारवेळा अटक व्हायला हवी’ अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक राणे जिथे थांबले होते, तिथे पोहोचले. राजशिष्टाचाराचे सर्व उपचार पाळल्यानंतर पोलिसांनी राणेंना अटक केली. राणेंना रत्नागिरी पोलीस ठाण्यात नेल्यानंतर कागदपत्रांचं सोपस्कार पार पडल्यानंतर त्यांना नाशिक पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे.