सरकारी बाबू संपात, पंचनामे विना शेतकऱ्याचे हाल; अवकाळीने शेतीचे नुकसान

सरकारी बाबू संपात, पंचनामे विना शेतकऱ्याचे हाल; अवकाळीने शेतीचे नुकसान

aslam shanedivan | Updated on: Mar 17, 2023 | 10:42 AM

चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान आहे. तालुक्यातील 53 गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

जळगाव : राज्यात सततच्या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली असतानाच अवकाळी पावसाचे संकट देखील धडकले. याच्याआधीच राज्यात अवकाळीमुळे शेतीचे मोठं नुकसान झाल्याने अधिवेशनात विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. त्यातच विजांच्या कडकडाटासह गारपीट आणि पाऊसाने जळगावला झोडपलं आहे. त्यामुळे चोपडा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान आहे. तालुक्यातील 53 गावांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. सुमारे 2 हजार 100 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून शासकीय कर्मचारी संपावर असल्याने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यासाठी कर्मचारी देखील उपलब्ध नाही. त्यामुळे आधीच झालेल्या नुकसानीचे पंचनामे बाकी असून त्यातच आता पुन्हा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यान झाले आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Follow Us