खवड्या डोंगर: कुटुंबातील एकही व्यक्ती… कुणालच्या शेजाऱ्यांनी दिली चक्रावणारी माहिती, अखेरच्या चार महिन्यांमध्ये…
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. झालटा परिसरातील एका घरात 19 वर्षीय कुणाल नावाच्या तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या आई-वडिलांचाही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल घडली असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. झालटा परिसरातील एका घरात 19 वर्षीय कुणाल नावाच्या तरुणाने जीव दिला. त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या त्याच्या आई-वडिलांचाही या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल घडली असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.
पोलिसांनी या घटनेचा पंचनामा सुरू केला असून, मृतांचे नातेवाईक आणि पोलिसांची उपस्थिती घटनास्थळी दिसून येत आहे. हे कुटुंब सुमारे चार महिन्यांपूर्वीच झालटा परिसरातील एका भाड्याच्या घरात राहायला आले होते. शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या या भागात त्यांचे वास्तव्य होते.
महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी राहणाऱ्या लहान मुलाने सांगितले आहे की, कुटुूंबातील एकही व्यक्ती शेजाऱ्यांशी फारसं बोलली नाही. कुणाल आमच्या सोबत खेळायला येत नसायचा असं शेजारच्या मुलाने सांगितलं आहे. तो फक्त कुत्र्याला घेऊन बाहेर फिरायाला याचा आणि त्यावेळी पुर्ण वेळ तो फोनमध्ये व्यस्त असायचा… ते लोकं चार महिन्यापुर्वीच भाड्याने इथं राहायला आले होते. पण इतक्या महिन्यांनतंरही त्यांच्या विषयी कोणाला काहीच समजलं नव्हतं.
कुणालच्या आत्महत्येच्या प्रयत्नामागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मोबाईलच्या वापरामुळे ही घटना घडल्याची काही जणांकडून चर्चा सुरू असली तरी, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण समाजमन हळहळले आहे.
