राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

| Updated on: Apr 19, 2022 | 9:36 AM

राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ऊर्जमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती असणार आहे.

राज्यातील वीज संकटावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक तातडीची बैठक बोलावली आहे. आज दुपारी बारा वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ऊर्जमंत्री नितीन राऊत यांची उपस्थिती असणार आहे. तसेच राज्यातील सर्व वीज कंपन्यांचे डायरेक्टर देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राज्यात वीज संकट गंभीर बनले आहे. केवळ एक ते दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा राज्यात शिल्लक आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक बोलवली आहे.