CM Uddhav Thackeray | मविआ सरकारला आज 2 वर्ष पूर्ण, मुख्यमंत्र्यांचं जनतेचं आभार

CM Uddhav Thackeray | मविआ सरकारला आज 2 वर्ष पूर्ण, मुख्यमंत्र्यांचं जनतेचं आभार

| Edited By: | Updated on: Nov 28, 2021 | 7:58 PM

मुंबईला नागपूरशी जोडणार 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई-पुणे महामार्गाची क्षमतावाढ, कोकणातील काही सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पुर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन वर्षाच्या कामाचा लेखाजोखा माडला आहे. त्यात ठाकरे सरकार आणि त्यांच्या मंत्रिमडळाच्या काही योजनांची आणि  विकासकामांची सविस्तर माहिती दिली आहे. भाजपकडून मात्र आघाडी सरकारवर जोरदार टीका होताना पहायला मिळत आहे. मुंबईला नागपूरशी जोडणार 701 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई-पुणे महामार्गाची क्षमतावाढ, कोकणातील काही सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यात आली आहे. मुंबईतील मेट्रो कामांची, पुणे आणि नागपुरातील मेट्रो कामे, अशा अनेक योजनांची माहिती दिली आहे.