मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम

मोठी बातमी! CJP-सरकारची निर्णायक बैठक सुरू; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर CJP ठाम

| Updated on: Jul 24, 2026 | 2:56 PM

दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि CJP (कॉक्रोच जनता पार्टी) यांच्यातील महत्त्वाच्या चर्चेच्या ठिकाणी ऐनवेळी बदल करण्यात आला आहे. यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या स्थळाऐवजी आता दिल्लीतील VP हाऊस येथे ही बैठक सुरू होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, CJPचे शिष्टमंडळ VP हाऊसकडे रवाना झाले असून, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह हे CJP प्रतिनिधींशी चर्चा करत आहेत. विद्यार्थी आंदोलन आणि NEET पेपरफुटी प्रकरणावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने या बैठकीकडे देशभराचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर CJP अद्याप ठाम असल्याचे पक्षाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी माध्यमांशी बोलताना, “धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच नाही,” अशी भूमिका कायम असल्याचे सांगितले.

या बैठकीतून सरकार आणि CJP यांच्यात कोणता तोडगा निघतो, तसेच धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत केंद्र सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता देशभराचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 24, 2026 2:56 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us