Solapur | सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव, गावात छावणी तैनात

Solapur | सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव, गावात छावणी तैनात

| Updated on: Apr 02, 2026 | 12:32 PM

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजन गावात महापुरुषांच्या पुतळा बसवण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. काल रात्री काही जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर पोलीसांनी आंदोलकांना हुसकवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज अंजन गावात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजन गावात महापुरुषांच्या पुतळा बसवण्याच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे. काल रात्री काही जमावाने पोलिसांवर दगडफेक केली होती. या घटनेनंतर पोलीसांनी आंदोलकांना हुसकवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आज अंजन गावात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. एका गटाने पुतळ्यासमोर तर दुसऱ्या गटाने मंदिराच्या आवारात बसून घोषणाबाजी सुरू केली आहे. पोलिसांनी दोन्ही गटांना हटवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली आणि परिस्थिती पुन्हा तणावपूर्ण झाली. पोलिस प्रशासनाने आधीच जमावबंदीचे आदेश जारी केले असून, संबंधित सूचना दिल्या आहेत. तरीसुद्धा दोन्ही गट आजही जमले आहेत. कायदा व सुव्यवस्थेची तक्रार उद्भवू नये यासाठी पोलिसांनी गावात छावणी तैनात केली आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.

Published on: Apr 02, 2026 12:32 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us