Devendra Fadnavis | समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान – फडणवीस
नांदेड मधील हिंद -दी -चादर या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधत गुरूंच्या बलिदानाचे महत्व सांगितले आहे. आपल्या गुरुंच्या बलिदानामुळेच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत, असे भावनिक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
नांदेड मधील हिंद -दी -चादर या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेशी संवाद साधत गुरूंच्या बलिदानाचे महत्व सांगितले आहे. आपल्या गुरुंच्या बलिदानामुळेच आज आपण सर्वजण सुरक्षित आहोत, असे भावनिक वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत, समाज घडवण्यात गुरुंचे योगदान अमूल्य असल्याचे सांगितले. गुरुंनी दिलेल्या संस्कारांमुळेच व्यक्तीला योग्य दिशा मिळते आणि राष्ट्रासाठी योगदान देण्याची प्रेरणा मिळते, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या गुरुंनी स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून समाजासाठी, देशासाठी जे कार्य केले, त्याच बलिदानावर आजची पिढी उभी आहे, असे फडणवीस म्हणाले. गुरुंच्या शिकवणीचा विसर पडता कामा नये आणि त्यांच्या विचारांवर चालणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
