Devendra Fadnavis : … तेवढं डोकं आहे सरकारकडे, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवरून मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता फटकारलं

Devendra Fadnavis : … तेवढं डोकं आहे सरकारकडे, राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवरून मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता फटकारलं

| Updated on: Jun 10, 2025 | 7:24 PM

भाडेवाढ न करता सर्व लोकल AC करणार असून रेल्वे दुर्घटना टाळण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर फडणवीसांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केले आहे.

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेमध्ये सोमवारी चार प्रवाशांचा मृत्यू झाल्यानंतर आज रेल्वे प्रशासनाला अक्कल आल्याचं दिसून आलं आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकलच्या त्या वळणावर वेग कमी करण्यात आला. तर लोकलमधून प्रवास करताना आजही काही प्रवासी लटकलेले पाहायला मिळाले, काही प्रवासी चुकीच्या दिशेने उतरून रेल्वे रूळ क्रॉस करताना दिसले. भाडे न वाढवता एसी लोकल देण्याचा प्लॅन असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. ‘लोकलाला दरवाजे लावल्यास लोकं गुदमरतील, कारण इतकी गर्दी लोकलध्ये असते. त्याची कल्पना आहे का तुम्हाला?’, असा सवाल करत राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला होता. त्यावर फडणवीसांनी नाव न घेता उत्तर दिलंय. दरवाजे लावताना व्हेन्टिलेशनची व्यवस्था करण इतकं डोकं सरकराकडे आहे असं म्हणत फडणवीसांनी टीकाकारांवर पलटवार केलाय. बघा व्हिडीओ

Published on: Jun 10, 2025 07:24 PM