CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! महत्त्वाच्या पदी नियुक्त केलेल्या नेत्याला 24 तासांतच केलं निष्कासित
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि दाक्षिणात्य सुपरस्टार Vijay सध्या त्यांच्या एका मोठ्या निर्णयामुळे चर्चेत आले आहेत. 2026 विधानसभा निवडणुकीत टीव्हीके पक्षाने 108 जागांवर विजय मिळवत राज्यात मोठा राजकीय बदल घडवून आणला. काँग्रेसच्या पाठिंब्याने विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी प्रशासनात अनेक महत्त्वाचे बदल करण्यास सुरुवात केली आहे.

याच दरम्यान विजय यांनी राधान पंडित यांची राजकीय ओएसडी म्हणून नियुक्ती केली होती. हा निर्णय पक्ष आणि प्रशासनात मोठा मानला जात होता. मात्र नियुक्ती जाहीर झाल्यानंतर अवघ्या 24 तासांतच विजय यांनी हा निर्णय मागे घेतला. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अचानक घेतलेल्या या यू-टर्नमागे नेमके कोणते कारण आहे, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. पक्षातील काही नेत्यांनी या नियुक्तीवर नाराजी व्यक्त केल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे विजय यांच्या पहिल्याच मोठ्या निर्णयामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.