मातोश्रीवर या आणि पश्चाताप व्यक्त करा; राऊतांनी नेमकं कुणाला दिल निमंत्रण?

| Updated on: Jun 03, 2026 | 12:19 PM

नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातील नाराजी आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षातील नेतृत्व, संघटनात्मक निर्णय आणि दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य केले. पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, शिवसेनेत कोणतेही गट-तट नाहीत. “मी या पक्षाचा नेता आहे. माझ्या सहीशिवाय एकही नियुक्ती होणार नाही.

नाशिकमधील शिवसेना ठाकरे गटातील नाराजी आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पक्षातील नेतृत्व, संघटनात्मक निर्णय आणि दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांवर भाष्य केले. पक्षातील अंतर्गत मतभेदांच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, शिवसेनेत कोणतेही गट-तट नाहीत. “मी या पक्षाचा नेता आहे. माझ्या सहीशिवाय एकही नियुक्ती होणार नाही. पक्षात एकच गट आहे आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचा,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नाशिकमधील नाराजीच्या चर्चांना त्यांनी फेटाळून लावण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी अलीकडेच दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र याव्यात अशी इच्छा व्यक्त केली होती. यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, “दोन्ही शिवसेना एकत्र यायच्या असतील तर आधी मातोश्रीवर यावे आणि पश्चाताप व्यक्त करावा. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.” त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना एकत्रीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्यात होत असलेल्या विधान परिषद निवडणुकांबाबत बोलताना राऊत यांनी सांगितले की, काही अपवाद वगळता महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. “निवडणुका बिनविरोध होऊ नयेत, यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहोत. विधान परिषद निवडणुका गोपनीय मतदान पद्धतीने होतात. नाशिकमध्ये काय घडते, हे पाहावे लागेल,” असे ते म्हणाले.

नाशिकमधील उमेदवारी प्रक्रियेवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, काही इच्छुकांनी अर्ज घेतले होते, मात्र मतांच्या गणितामुळे अनेकांनी पुढे येणे टाळले. “उमेदवार दिला नाही म्हणून ती आमची चूक नाही. मतांमध्ये मोठी तफावत असल्याने इच्छुक पुढे आले नाहीत. ही निवडणूक केवळ नाशिकपुरती मर्यादित नसून संपूर्ण राज्याशी संबंधित आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच राज्यात घोडेबाजाराच्या चर्चांवर बोलताना राऊत यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, उपलब्ध मतांचा वापर कोणाच्या समर्थनासाठी करायचा याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील. त्यांच्या या वक्तव्यांमुळे नाशिकसह राज्यातील राजकीय घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 03, 2026 12:18 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us