Vidhan Parishad | नेते काँग्रेसचे मात्र मतं गेली महायुतीला… बड्या नेत्याने अखरे सांगितलंच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते आ. कृपाल तुमाने यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत विसंवादाचा फटका त्यांना या निवडणुकीत बसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये महायुतीला मोठे यश मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते आ. कृपाल तुमाने यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस पक्षातील अंतर्गत विसंवादाचा फटका त्यांना या निवडणुकीत बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी काँग्रेसला केवळ 4 ते 5 मते मिळाली, तर काही ठिकाणी खातेही उघडता आले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
आ. कृपाल तुमाने म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विदर्भातील मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठा पाठिंबा दिला. विकासाच्या मुद्द्यावर महायुती काम करत असल्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनीही महायुतीच्या बाजूने मतदान केल्याचा दावा त्यांनी केला.
तसेच आगामी काळातही महायुतीला जनतेचा मोठा पाठिंबा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काँग्रेसने आपल्या संघटनेतील मतभेद दूर केले नाहीत तर भविष्यात आणखी मोठा फटका बसू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
