Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू

Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू

| Updated on: Oct 07, 2026 | 5:50 PM

दिल्लीतील जंतरमंतरकडे निघालेल्या काँग्रेस खासदारांच्या बसेस पोलिसांनी अडवल्या. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक खासदार बसमधून खाली उतरले. पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखल्यानंतर राहुल गांधी व प्रियांका गांधींनी कार्यकर्त्यांसह त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केले. हा मोर्चा निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात होता.

दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित आंदोलनासाठी निघालेल्या काँग्रेस पक्षाच्या खासदारांच्या बसेस पोलिसांनी अडवल्या. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक खासदार या बसेसमधून प्रवास करत होते. जंतरमंतरपासून काही मिनिटांच्या अंतरावर असताना या बसेस रोखण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला.

पोलिसांनी बसेस अडवण्यासाठी बॅरिकेटिंग केले आणि काही बसेसच्या टायरमधील हवा देखील काढल्याचे समोर आले. सुमारे दीड तास बसेस पुढे सरकत नसल्याने राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि इतर खासदार बसमधून खाली उतरले. त्यांनी पायीच जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांनाही बॅरिकेटिंग करून पुढे जाण्यापासून रोखले.

या परिस्थितीनंतर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कार्यकर्त्यांना त्याच ठिकाणी ठिय्या देण्याचे आवाहन केले. त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि इंडिया आघाडीचे खासदार अडवलेल्या ठिकाणीच ठिय्या देऊन बसले. निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत होते. या घटनेमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण तापले असून, पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.

Published on: Oct 07, 2026 5:50 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us