Corona Vaccination | घरोघरी लसीकरणाचा निर्णय घ्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Corona Vaccination | घरोघरी लसीकरणाचा निर्णय घ्या, हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश

| Updated on: Jun 15, 2021 | 10:09 AM

राज्य सरकारने मुंबई महापालिकेने घरोघरी लसीकरणाला सुरुवात केली, तर तुम्ही त्यांना रोखणार का? असा सवाल हायकोर्टाने केला आहे. (COVID-19 vaccination: Guidelines do not allow door-to-door drive, Centre tells Bombay HC)

मुंबई : केरळ, जम्मू कश्मीर आदी राज्यांनी केंद्राची परवानगी न घेताच घरोघरी लसीकरणास सुरुवात केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही घरोघरी जाऊन लस देण्यास हरकत नाही. घरोघरी लसीकरणाबाबत राज्य सरकारने आठवडाभरात निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. घरोघरी लसीकरणासंदर्भात केरळ, जम्मू कश्मीरने केंद्राची परवानगी न घेताच लसीकरणाला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई महापालिकेने घरोघरी लसीकरणाला सुरुवात केली, तर तुम्ही त्यांना रोखणार का? असा सवाल हायकोर्टाने केला आहे. (COVID-19 vaccination: Guidelines do not allow door-to-door drive, Centre tells Bombay HC)