Kabutar Khana : दादरमधील कबुतरखाना BMC नं ताडपत्रीनं झाकला अन् जैन समाज आक्रमक, मंत्री लोढांची मागणी काय?

Kabutar Khana : दादरमधील कबुतरखाना BMC नं ताडपत्रीनं झाकला अन् जैन समाज आक्रमक, मंत्री लोढांची मागणी काय?

| Updated on: Aug 04, 2025 | 12:35 PM

मुंबई महानगरपालिकेकडून दादर मधील कबुतरखाना तात्पुरता बंद करण्यात आलाय. मुंबई महापालिकेनं दादर मधील कबुतरखाना ताडपत्रीने झाकून टाकलाय. कबुतरखाना बंद केल्यानंतर जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यासाठी मुंबईत मोर्चा देखील काढण्यात आलाय. तर सुवर्ण मध्य काढा अशा मागणीच पत्र मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिल आहे.

दादर मधल्या कबुतरखान्यावरील पालिकेच्या कारवाईनंतर जैन समाज आक्रमक झालाय. मुंबईत जैन समाजाकडून शांतीदूत यात्रा काढत विरोध दर्शविण्यात आलाय. कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आजार होतात. हे कारण वरवरचे असून मुंबईतल्या मोठ्या जागा आणि चौक हडपण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचा आरोप मोर्चातून करण्यात आलाय. मुंबईतले असे अनेक कबुतरखाने बंद होणार आहेत. याची सुरुवात दादर मधल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या कबुतरखान्यापासून झाली आहे. त्यामुळे जैन समाज आक्रमक झाला आहे. मुंबईतल्या कुलाबा जैन मंदिरातून गेटवे ऑफ इंडियापर्यंत ही शांतीदूत यात्रा काढण्यात आली.

मुंबईतील कबुतरखाने बंद करावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होतेय. त्यानुसार मुंबई महापालिकेकडून मुंबईतील दादर कबुतरखान्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. तर मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानंतर महापालिकेने दादर कबुतरखाना बंद केलाय. मुंबई महानगरपालिकेने दादरमधील ९२ वर्षे जुना कबुतरखाना तात्पुरता बंद केला आहे. हा निर्णय जैन समाजाच्या तीव्र विरोधाला सामोरा गेला आहे. कोर्टाच्या निर्देशानुसार हा कबुतरखाना बंद करण्यात आला असून, कबुतरांना अन्न देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पर्यायी जागा शोधण्याची मागणी केली आहे.

Published on: Aug 04, 2025 12:34 PM