महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ… भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
राज्यातील शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये आयोजित जाहीर सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
दत्ता भरणे म्हणाले, “चांगली माणसं महाराष्ट्रात राहिलीच पाहिजेत. आपल्या आसपासच राहिली पाहिजेत मात्र पांडुरंगाकडे एकच विनंती कर, योग्य वेळी देवाभाऊंना देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी. महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून लांब आहे, म्हणूनच मी योग्य वेळी म्हणतोय. आज उद्या नाही तर योग्य वेळी”
कार्यक्रमात त्यांनी सांगितले की कोणत्याही निवडणूकीसाठी नाही तर शब्द दिला होता म्हणून राज्यातील असंख्य शेतकऱ्यांपर्यंत कर्जमुक्ती पोहोचवली. “आज महायुतीत आपण एकत्र आहोत. शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीची माहिती पोहोचली पाहिजे, यासाठी हा सरकार कार्यक्रम घेण्यात आला आहे,” असे ते म्हणाले.
दत्ता भरणे यांनी गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचाही उल्लेख केला. “गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली, पिके वाहून गेली, अशात आपल्याला कोणी मदत केली असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी. आज अजितदादा आपल्यात नाहीत. अशा वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः फिरत जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. बोलणं सोपं पण करणं अवघड असतं, तरी त्यांनी केलं” असे त्यांनी सांगितले.
