Datta Jayanti : कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा मोठा उत्साह, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, बघा VIDEO

Datta Jayanti : कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा मोठा उत्साह, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी, बघा VIDEO

Updated on: Dec 04, 2025 | 2:30 PM

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली असून, तीन ते चार तास रांगेत उभे राहून भक्त दर्शन घेत आहेत. कृष्णा-पंचगंगा संगमावर वसलेल्या या मंदिरात दिवसभर विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत, ज्यात महाअभिषेक आणि सायंकाळी दत्त जन्मकाळ सोहळा मुख्य आकर्षण आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात आज दत्त जयंतीचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. पहाटेपासूनच देशभरातील दत्त भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली असून, रांगा तीन ते चार तास लांबल्या आहेत. गुरुदेव दत्तांचे अवतार नरसिंह सरस्वती यांनी १२ वर्षे या ठिकाणी तपश्चर्या केल्यामुळे नृसिंहवाडीला दत्त भक्तांमध्ये विशेष महत्त्व आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेल्या या मंदिरात दर्शनापूर्वी भाविक पवित्र स्नानासाठी येतात. मंदिर देवस्थान समितीने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. दिवसभर महाअभिषेक व अन्य धार्मिक विधी पार पडणार असून, सायंकाळी पाच वाजता दत्त जन्मकाळ सोहळा उत्साहात साजरा होईल.

Published on: Dec 04, 2025 02:30 PM