मामा, तुम्ही शब्द दिला होता…; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दत्ता भरणेंचं उत्तर वादात
राज्यातील शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून, मंत्री दत्ता भरणे यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी केलेल्या विधानावरून विरोधक आणि शेतकरी संघटनांकडून टीका केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबत दत्ता भरणे यांच्याकडे पाठपुरावा करताना, “मामा, तुम्ही आम्हाला शब्द दिला होता,” अशी आठवण करून दिली. त्यावर उत्तर देताना भरणे म्हणाले, “तुम्ही मोठी माणसं आहात आणि मी साधा माणूस आहे.” तसेच, “मी कोणताही शब्द दिला नव्हता. ज्यांच्या सांगण्यावरून आंदोलन केले, त्यांनाच पंचनामे करायला सांगा,” असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे.
या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मदतीची अपेक्षा असताना जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भरणे यांच्यावर केला जात आहे. अनेकांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शेतकऱ्यांच्या भावनांचा अवमान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दरम्यान, दत्ता भरणे यांच्या या वक्तव्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. शेतकरी प्रश्नांवर सरकारची भूमिका आणि संबंधित प्रकरणात पुढे काय घडामोडी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.