Ajit Pawar : ….तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार, अजितदादांचा जाहीरपणे शब्द, बघा काय म्हणाले?

Ajit Pawar : ….तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे मिळणार, अजितदादांचा जाहीरपणे शब्द, बघा काय म्हणाले?

| Updated on: Jun 10, 2025 | 6:38 PM

विरोधक सातत्याने महायुती सरकारची लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचे वक्तव्य करताना दिसताय. मात्र आज पुण्यात लाडकी बहीण योजना बंद होणार की नाही? यावर अजित पवारांनी उत्तर दिले आहे.

आता निवडणुका झाल्यात तर लाडकी बहीण योजना आणि त्याद्वारे मिळणारे पैसे बंद करण्यात येतील अशा बातम्या येत असल्याचे अजित पवार म्हणाले. पुढे बोलत असताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असे सांगून राज्यातील महिला वर्गाला आश्वस्त करत म्हणाले, जोपर्यंत आम्ही महायुतीत काम करतो तोपर्यंत लाडक्या बहिणींचे पैसे बंद होऊ देणार नाही. असा शब्द लाडक्या बहिणींना अजित पवार यांनी दिलाय. महिना संपल्यावर आदिती तटकरे मला संपर्क साधते आणि दादा महिलांना पैसे द्या म्हणून सांगते. आम्ही तातडीने पैसे देतो, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आज साजरा करण्यात येतोय. या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यात पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी लाडक्या बहिणींना देखील लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असल्याचे आश्वासन दिले.

Published on: Jun 10, 2025 06:38 PM