Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी… दादांना नेमकं म्हणायचंय तरी काय?

Ajit Pawar : अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी… दादांना नेमकं म्हणायचंय तरी काय?

Harshada Shinkar | Updated on: May 03, 2025 | 9:51 PM

मुंबईत बोलत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2 मे रोजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्याची इच्छा अप्रत्यक्षपणे सांगितली आहे. बघा नेमकं काय म्हणाले?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा बोलून दाखवली. यानंतर राजकीय वर्तुळातील सर्वच नेते मंडळींनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार 2 मे रोजी मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात एका वक्त्याने राज्यात मुख्यमंत्रिपदी महिला विराजमान व्हायला पाहिजे, अशी आशा व्यक्त केली होती. यावरच बोलत असताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर भाष्य केल्याचे पाहायला मिळाले होते. “राही भिडे म्हणाल्या की भविष्यात या महाराष्ट्रात एखादी महिला मुख्यमंत्री झाली पाहिजे. आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं. पण शेवटी तो योग जुळून यावा लागतो. कारण मलाही गेल्या अनेक वर्षांपासून वाटतं की मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठे जमतंय,” असे मिश्किल वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींकडून या वक्तव्याबाबत प्रश्न करणयात आल्यानंतर सीएम पदाबाबतचं माझं वक्तव्य मागे घेतो, अशी मिश्कील प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

Published on: May 03, 2025 9:51 PM
Follow Us