Ajit Pawar : म्हणजे आम्ही बिनडोक? तुलाच लय कळतंय व्हय शहाण्या! अजितदादा कोणावर भडकले

Ajit Pawar : म्हणजे आम्ही बिनडोक? तुलाच लय कळतंय व्हय शहाण्या! अजितदादा कोणावर भडकले

| Updated on: Aug 08, 2025 | 11:44 AM

अजित पवार यांनी अनेकदा आपल्या मिश्किल आणि रोखठोक शैलीने राजकीय कार्यक्रमांमध्ये हास्य फुलवले आहे. अलीकडेच त्यांनी एक वक्तव्य केलंय त्याची चांगलीच चर्चा होतेय.

पुण्यातील चाकण येथे वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळीच दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी आलेले अजित पवारांनी दौऱ्यादरम्यान एका हॉटेलचे उद्घाटनही केले. यावेळी त्यांच्याकडे वेळ कमी असल्याने त्यांनी नाश्ता जेवण करण्यास नकार दिला. इतकंच नाहीतर मी पुढच्यावेळी हॉटेलला जेवायला आलो तर माझं बिल घेऊ नका, अशी अजित दादांनी यावेळी मिश्किल टिप्पणी केली.

अजित पवार यांनी बोलताना सांगितले की, हॉटेल मालक मला म्हणाले अजित दादा नाष्टा करुन जा, पण आज खरंच वेळ नाही. पुढच्या वेळी आलो की नक्की जेवण करेन. तेव्हा मात्र माझं बिल घेऊ नका. पुढे दादा असंही म्हणाले, पण हा चेष्टेचा भाग झाला. मी स्पष्ट सांगतो. राजकारण आणि व्यवसाय स्वतंत्र ठेवा. हॉटेलमध्ये कोणी ही येऊ द्या, बिल सर्वांचं घ्या. असं केलं नाही तर दिवाळं निघेल. हॉटेल बंद करण्याची वेळ येईल. असं बोलत असताना भाषणामध्ये बोलणाऱ्याला अजित दादांनी झापल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Aug 08, 2025 11:41 AM