पोट निवडणुकीसाठी ‘भाजप’च्या विनंतीला ‘मविआ’ मान देणार का?

| Updated on: Feb 04, 2023 | 9:36 AM

कसब्याची जागा काँग्रेस, तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढवणार? पोटनिवडणुकीबाबत आज अंतिम निर्णय

Follow us on

मुंबई : कसबा, चिंचवड या दोन ठिकाणची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी उपमुख्यमंत्री आता प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून कसब्याची जागा काँग्रेस, तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढवण्याची तयारी सुरू झाली आहे. कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या घडामोडींना आता वेग आला असून ही लढत चुरशीची होणार असल्याचे दिसतेय.

दरम्यान, विरोधकांना फोन करून बिनविरोध निवडणुकीसाठी विनंती करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गेल्या निवडणुकीचा दाखला विरोधकांनी देत ही निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे म्हटले आहे, त्यामुळे निवडणूक लढवण्यावर महाविकास आघाडी ठाम असल्याचे म्हटले जात आहे तर असे असले तरी भाजपने निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. अशातच पोट निवडणुकीसाठी भाजपच्या विनंतीला मविआ मान देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठऱणार आहे.