India-Pakistan War :  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत बैठक, भारताची पुढची रणनिती ठरणार

India-Pakistan War : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत बैठक, भारताची पुढची रणनिती ठरणार

| Updated on: May 09, 2025 | 1:21 PM

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि संभाव्य व्यापक संघर्षाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले की, भारत कोणत्याही सीमा आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यात अडथळा बनू देणार नाही आणि त्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

केंद्रीय सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भारताच्या तिनही दलाच्या प्रमुखांसोबत एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. काल पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्यानंतर आणि त्याला भारताकडून देण्यात आलेलं प्रत्युत्तर यानंतर भारताची पुढची रणनिती काय असणार? यासंदर्भात सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह भारताच्या तिनही दलांसोबत चर्चा करताय. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी सीडीएस जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सेवा प्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीत देशातील सध्याच्या सुरक्षा परिस्थिती आणि संभाव्य धोक्यांबद्दल सविस्तर चर्चा सुरू असून सीमेवरील अलीकडील हालचाली आणि ऑपरेशनल तयारीचा आढावा घेण्यात येतोय. या बैठकीनंतर, संरक्षण मंत्री डीआरडीओ प्रमुखांना भेटणार असून जिथे संरक्षण मंत्री देशात असलेल्या शस्त्रास्त्रांचा, लष्करी उपकरणांची उपलब्धता आणि स्वदेशी संरक्षण उत्पादनाच्या प्रगतीचा आढावा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. संरक्षण रणनीतीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

Published on: May 09, 2025 01:21 PM