Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना…
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आम आदमी पक्ष आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी गांधी जयंतीदिनी दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन केले. पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. अनेक कार्यकर्त्यांना व्हॅनमध्ये बसवून ताब्यात घेतले जात आहे.
दिल्लीच्या जंतर-मंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आम आदमी पक्ष (आप) आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी तीव्र आंदोलन केले आहे. आज, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीदिनी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांची वाढती संख्या लक्षात घेता, पोलिसांनी तात्काळ पावले उचलली आहेत.
जंतर-मंतर परिसरात मोठ्या संख्येने पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. पोलिसांकडून आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न सुरू असून, अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे. थेट दिल्लीतून मिळालेल्या दृश्यांनुसार, आंदोलकांना पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसवून नेले जात आहे. आपसह इतर अनेक डावे पक्ष ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या आंदोलनामुळे जंतर-मंतर परिसरातील वातावरण तापले आहे.
Published on: Oct 02, 2026 11:59 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us
