Red Fort Attack Investigation: स्फोटाचं कनेक्शन थेट तुर्कीपासून अफगाणिस्तानपर्यंत… जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला!

Red Fort Attack Investigation: स्फोटाचं कनेक्शन थेट तुर्कीपासून अफगाणिस्तानपर्यंत… जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला!

| Updated on: Nov 12, 2025 | 5:55 PM

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील स्फोटाचे धागे तुर्किये आणि अफगाणिस्तानपर्यंत पोहोचले आहेत. जैश-ए-मोहम्मदच्या हेडक्वार्टरवरील कारवाईचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवल्याचे समोर आले आहे. डॉक्टर मॉड्यूल या गटाने कट रचला होता आणि २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत, तर ३०० किलो अजूनही गायब आहेत. पंतप्रधान मोदींनी जखमींची विचारपूस केली.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या स्फोटाचे धागे तुर्किये आणि अफगाणिस्तानपर्यंत पोहोचले असून, जैश-ए-मोहम्मदच्या बहावलपूर येथील हेडक्वार्टरवरील कारवाईचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. डॉक्टर उमर नबी हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून त्याने दिल्लीत आत्मघाती स्फोट घडवला. तपास यंत्रणांनी डॉक्टर मॉड्यूल नावाच्या एका गटाला फरिदाबादमधून अटक केली आहे, ज्यात डॉ. शाहीन, डॉ. मुजम्मिल आणि डॉ. अदिल यांचा समावेश आहे. हे हँडलर्स तुर्किये आणि अफगाणिस्तानमधून टेलिग्राम ग्रुपद्वारे संपर्कात होते आणि स्फोटाची योजना आखत होते.

अल फलाह युनिव्हर्सिटी परिसरातून २९०० किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आले असून, अजूनही ३०० किलो स्फोटके गायब आहेत. डॉ. मुजम्मिल आणि उमरने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात लाल किल्ल्याची रेकी केली होती आणि २६ जानेवारीला लक्ष करण्याची त्यांची योजना होती. स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जखमी झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान दौऱ्याहून परतल्यानंतर एलएनजेपी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. या प्रकरणी जम्मू-काश्मीरमध्येही छापेमारी सुरू आहे.

Published on: Nov 12, 2025 05:55 PM