भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरोप

भयंकर! चालत्या बसमध्ये महिलेसोबत नको नको ते घडलं, बस चालकावर गंभीर आरोप

| Updated on: May 14, 2026 | 11:40 AM

दिल्लीमध्ये एका महिलेसोबत धक्कादायक अत्याचाराची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे देशाच्या राजधानीत मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत बस चालक आणि कंडक्टरला अटक केली आहे. संबंधित घटनेत वापरण्यात आलेली बसही पोलिसांनी जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दिल्लीतील राणी बाग परिसरात ही घटना घडली. पीडित महिला पीतमपुरा येथील झोपडपट्टी भागात राहते आणि मंगोलपुरी परिसरातील एका खासगी कंपनीत काम करते. कामावरून घरी परतत असताना तिच्यासोबत बसमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महिलेच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Published on: May 14, 2026 11:34 AM
Follow Us