शेतकऱ्यांना गुड न्यूज! नमो शेतकरी योजनेचे पैसे खात्यात जमा
महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासंमान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारच्या किसान सम्मान योजनेसोबत हा अतिरिक्त निधी शेतकऱ्यांना मदत करेल, असे सांगण्यात आले आहे. सुमारे 91 लाख शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील महायुती सरकारने नमो शेतकरी महासंमान योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या किसान सम्मान योजनेतील सहा हजार रुपयांसोबत महाराष्ट्र सरकारकडूनही सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. म्हणजेच शेतकऱ्यांना एकूण बारा हजार रुपये मिळतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, जवळपास 91 लाख 65 हजार 156 शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 1892 कोटी 61 लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये असे तीन हप्त्यात दिली जाते. सरकारचा हेतू शेतकऱ्यांना शेतीतील खर्चात मदत करणे हा आहे.
Published on: Sep 09, 2025 01:32 PM
