देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
राजधानी दिल्लीत अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. अनेक राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अनेक पक्षांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावरून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
राजधानी दिल्लीत अभिजीत दिपके आणि सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. अनेक राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पार्टीसह जवळपास सर्वच विरोधकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावरून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्यात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना दिल्लीतील आंदोलनाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना फडणवीस यांनी म्हटले की, मला वाटते सर्वांनी आपल्या देशाचा विचार केला पाहिजे, देशाची बदनामी होऊ नये याचा विचार केला पाहिजे. पहिल्या दिवसापासून माझे हे मत आहे.
